Breking News
Satyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य; रिक्षाचालक अटकेत

हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

आरोपीविरुद्ध २४ तासात आरोपपत्र

marathinews24.com

पुणे – शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी २४ तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. युुनूस गफार खान (वय ५५, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, खान याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वारगेट परिसरात खुनाचा प्रयत्न, वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी पीडीत ११ वर्षीय शाळकरी मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्या वेळी रिक्षाचालक खान याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खान पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. खान याला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.

गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करुन आवश्यक ते पुरावे संकलित करुन त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासात आरोपपत्र दाखल केले. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, निलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद साने, दत्तात्रय खेडेकर, कानेकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×