Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

स्वारगेट परिसरात खुनाचा प्रयत्न, वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा अटकेत

गुन्हे शाखेच्या युनिट दाेनने केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील स्वारगेट परिसरात एकाचा खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या सराइताला गुन्हे शाखेच्या युनिट दाेनने अटक केली. राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या वर्षी स्वारगेट परिसरात एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन आरोपी जुनी पसार झाला होता. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गेले वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता.

पुणे शहराच्या मध्यभागात पोलिसांकडून झाडाझडती – सविस्तर बातमी

पसार झालेला आरोपी एका इमारतीच्या तळमजल्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी विशाल दळवी आणि आझिम शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन त्याला गुन्हे शाखेने स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, साधना ताम्हाणे, संदीप शिर्के, विशाल दळवी, शंकर कुंभार, शंकर नेवसे, आझीम शेख, विजयकुमार पवार, ऋषीकेश व्यवहारे, सद्दाम तांबाेेेळी यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×