Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे शहराच्या मध्यभागात पोलिसांकडून झाडाझडती

विशेष मोहिमेत ४० जणांविरुद्ध कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, तसेच मध्यभागातील विश्रामबाग, खडक, समर्थ, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी रात्री झाडाझडती घेतली. या कारवाईत वेगवेगळ्या भागांत तपासणी करण्यात आली. बेकायदा प्रकार करणाऱ्या ४० जणांविरुद्ध खटले, तसेच गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.

‘वंशाला दिवा नाही’ म्हणत विवाहितेचा केला छळ – सविस्तर बातमी

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली.

मध्यभागातील ४१ संवेदनशील ठिकाणे, मोकळ्या जागा, तसेच सार्वजनिक जागांची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक मद्यप्राशन, अमली पदार्थांचे सेवन, शांतता भंग करणे, तसेच छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री दोन तास ही माेहीम राबविण्यात आली. भारतीय न्याय संहिता २८५ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे (कोटपा ॲक्ट) अन्वये पाच खटले दाखल करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये २२ जणांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. ट्रिपल सीट जाणाऱ्या दहा दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली.

वाहन चालविताना मोबाइल संभाषण करणे, तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, समर्थ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके या कारवाईत सहभागी झाले होते. ‘यापुढील काळात पोलिसांकडून अचानक कारवाई करण्यात येेणार असून, संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात येणार आहे,’ असे पोलीस उपायुक्त रावले यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×