Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

‘वंशाला दिवा नाही’ म्हणत विवाहितेचा केला छळ

३ लाख रुपये उकळले, ६ जणांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत सातत्याने मानसिक व शारीरिक छळ, मारहाण करण्यात आली. तिच्या वडिलांकडून तीन लाख रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार विश्रांतवाडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २९ वर्षीय महिलेने याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुण्यात रिक्षा वळविण्याच्या वाद, गोळीबार करणाऱ्या टोळक्याला बेड्या – सविस्तर बातमी

आशिष कुमार बालाजी गोटमुकले, शालुबाई बालाजी गोटमुकले, बालाजी गोटमुकले, अश्विनी सुदर्शन हालगे, सुदर्शन हालगे आणि अर्चना रुषभसूर्यवंशी (सर्व रा. उदगीर, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २९ एप्रिल २०१६ पासून आजपर्यंत आरोपींकडून तक्रारदाराचा छळ सुरू होता. ‘वंशाला दिवा नाही’ असे बोलून तिचा मानसिक छळ करण्यात येत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार मारहाण व शिवीगाळ करण्यात येत होती. या त्रासामुळे तक्रारदाराला सतत भीतीच्या वातावरणात राहावे लागत होते. याशिवाय आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत तक्रारदाराच्या वडिलांकडून सुमारे ३ लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलिसांकडून सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×