Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात रिक्षा वळविण्याच्या वाद, गोळीबार करणाऱ्या टोळक्याला बेड्या

पिस्तूलासह दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – रिक्षा वळवण्याच्या वादातून पिस्तूलातून गोळी झाडून करीत खुनाचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूलासह दुचाकी असा ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. कुणाल ऊर्फ नन्या विनायक जाधव (वय १९ रा. वस्ती, कोंढवा) आदित्य शंकर घावरे (वय २१ रा. दबाडी रोड, वडगांव बुद्रूक) अक्षय ज्ञानेश्वर आवळे (वय २० रा. जाधवनगर, वडगांव) शिवाजी पांडुरंग मरगळे (वय २१ रा. गणपती मंदिरजवळ, शिवतेज नगर, कोल्हेवाडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

धक्कादायक मस्साजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे घर फोडले – सविस्तर बातमी

तक्रारदार आणि आरोपी यांच्यात ८ मार्चला कोंढव्यातील काकडे वस्तीवर रिक्षा वळवण्याच्या वादातून भांडण झाले होते. त्याच रागातून आरोपींनी धारदार हत्यार आणि पिस्टलमधुन फिर्यादीचे दिशेने फायर करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेतला जात होता. तपास पथक हे १० मार्चला पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार संतोष बनसुडे यांना आरोपी नामे कुणाल ऊर्फ नन्या जाधव हा साथीदारासह पारशी ग्राऊड, शिवनेरीनगरात असल्याची माहिती मिळाली.

कोंढवा तपास पथकाने चौघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांचेकडुन देशी बनावटीचे पिस्टल, दुचाकी जप्त केली आहे. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, रविंद्र चिप्पा, रशिद शेख, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, पुष्पेंद्र चव्हाण, शाहिद रजपुत, हिरवे, अमित सुर्यवंशी, रियाज पटेल, प्रशांत खाडे, यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×