Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

सासवड दिवे घाटात १०० ते १५० दुचाकीस्वारांनी कोयते नाचवले

पोलिसांचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये दहशत

marathinews24.com

पुणे – कायदा सुव्यस्थेबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होत असतानाच, ग्रामीण पोलिसांची हद्द असलेल्या दिवे घाटात तब्बल १०० ते १५० बुलेटस्वार दुचाकीस्वारांनी धुडगूस घातला. त्यातील काहीजणांनी हातात कोयते नाचवून परिसरातून जाणार्‍या प्रवाशांसह नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. तसेच गाण्यावर नाच करीत आपणच भाई असल्याचे दाखवून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ मोटारीतून जाणार्‍या नागरिकाने चित्रीत करून व्हायरल केला. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, नंगानाच करणार्‍या टोळक्याविरूद्ध पोलिसांनी दुर्लक्ष केलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यात खासगी रूग्णालयात ठेवला बॉम्ब – सविस्तर बातमी

दिवे घाटात १०० ते १५० दुचाकीस्वार टोळक्याने धुडगूस घालून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरमधून कानठळ्या बसवणारे आवाज काढले. त्यानंतर हातातील कोयते हवेत नाचवून गाण्यावर डान्सही केला. दरम्यान, टोळक्याचा नंगानाच पाहून परिसरातून जाणार्‍या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. टोळक्याचा तलवारी नाचवत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्यास प्राधान्य दिले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पथके कार्यरत होती. दरम्यान, तलवारी हवेत नाचवणार्‍या टोळक्याचा व्हिडिओ पोस्ट करीत आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील कायदा सुव्यस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×