Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभ

देऊळवाले समाजातील लाभार्थ्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याची भावना व्यक्त करत प्रशासनाचे मानले आभार

marathinews24.com

बारामती – महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूजा गार्डन, सुपे येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तहसीलदार गणेश शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे उपस्थित होते.

जैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडे – जीविधाच्या हिरवाई महोत्सवाला प्रारंभ – सविस्तर बातमी 

शिबारात ९० जिवंत सातबारा, २७ संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांचा लाभ, ११० जातीचे प्रमाणपत्र, १२४ रहिवाशी दाखले, १८ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ५७ प्रधानमंत्री आवास योजना ८ अ उतारा, ९४ आधारकार्ड यांच्यासह कृषी विभागाच्या १४ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, पुरवठा शाखेच्या वतीने २४६ तर २४१ लाभार्थ्यांची ईकेवायसी असे एकूण १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. यामध्ये नागरिकांना महाडीबीटी संकेतस्थळ, ई-केवायसीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली.

मापारी म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबाराअंतर्गत शेतकरी व ग्रामस्थांच्या तक्रारीचे जलद निराकरण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाच्या संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून त्यांच्या तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळस्तरावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूढेही हे अभियान राबवून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. मापारी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

देऊळवाले समाजातील नागरिक सतत स्थलांतर करीत असतात, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसतात, त्यामुळे ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. याबाबींचा विचार करता प्रशासनाने तत्परता दाखवत आज ४५ नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात दिले. नागरिकांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. गाव पातळीवर प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. आज कार्यक्रमात देऊळ समाजातील लाभार्थ्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याची भावना व्यक्त करुन प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे शासनाच्या विविध योजनांचे लाभास ते पात्र झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×