चंदननगरमधून ३ लॅपटाॅप चोरीला

चंदननगर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यंनी तीन लॅपटाॅप चोरून नेल्याची घटना चंदननगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि त्याचे मित्र एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता आहेत. त्यांनी चंदननगर भागातील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्वावर घेतली होती. सदनिका दरवाजा गुरुवारी (५ डिसेंबर) सायंकाळी उघडा होता. चोरट्यांनी संधी साधली. सदनिकेतून ९० हजारांचे तीन लॅपटाॅप चोरून चोरटे पसार झाले. पोलीस कर्मचारी कोळेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×