दुचाकीस्वार तरूणाला अडवून लुटले

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

कोंढवा रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का, अशी विचारणा करीत दोघा चोरट्यांनी तरूणाला अडवून ३९ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना ८ डिसेंबरला रात्री बाराच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणार्‍या तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जेवण न दिल्‍याने पित्‍यावर केला कोयत्‍याने हल्‍ला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण धनकवडीत राहायला असून, ८ डिसेंबरला रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी तरूणाला इस्कॉन मंदीराजवळ अडवले. तुला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का, अशी विचारणा करीत त्याच्या खिशातील ३९ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करीत आहेत.

गाडीच्या नावाखाली लुटमारीच्या घटना

शहरातील विविध भागातून रात्रीच्या सुमारास प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांसह मोटार चालकांचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरटे लुटमार करीत आहेत. विशेषतः आम्हाला कट का मारला, तुला गाडी चालवता येत नाही का, तुझ्यामुळे अपघात झाला आहे, अशी बतावणी करीत लुटमार केली जात आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×