बसप्रवासात १ लाख १८ हजारांचा मोबाइल चोरीला

पुण्यात पीएमपीएल प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास

शंकर महाराज मठ ते पद्मावती चौक सहकारनगर प्रवासादरम्यान घडली घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपील बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तरूणाच्या खिशातील १ लाख १८ हजारांचा मोबाइल चोरून नेला. ही घटना ७ डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास शंकर महाराज मठ ते पद्मावती चौक सहकारनगर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी मांजरी परिसरात राहणार्‍या १९ वर्षीय तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वार तरूणाला अडवून लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हडपसर परिसरातील मांजरीमध्ये राहायला असून, ७ डिसेंबरला दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पीएमपीएल बसने प्रवास करीत होता. शंकर महाराज मठ ते पद्मावती चौक सहकारनगर प्रवासादरम्यान बसमध्ये गर्दी होती. त्याचा फायदा घेउन चोरट्याने तरूणाच्या खिशातील १ लाख १८ हजार रूपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी पोलीस अमलदार राउत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×