Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

जत पूर्व भागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; कायदा-सुव्यवस्था धोक्यात

जत पूर्व भागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; कायदा-सुव्यवस्था धोक्यात

वाढत्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

marathinews24.com

जत : (रेवन कोळेकर) – जत तालुक्याच्या पूर्व भागात जुगार, मटका, अवैध दारू विक्री, गांजा लागवड व तस्करी, तसेच नुकतेच बोर्गी येथे बायोडिझेलसारख्या अवैध इंधन साठ्यांचा प्रकार समोर आला असतानाही संबंधित यंत्रणाची कारवाई अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. या बेकायदेशीर व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

‘मोक्का’ कारवाईतील फरार गुन्हेगाराची आत्महत्या – सविस्तर बातमी 

अलीकडेच बोर्गी खुर्द परिसरात सुमारे २१ लाख रुपयांचा अवैध बायोडिझेल साठा आढळून आला होता. राष्ट्रीय महामार्गालगत गेल्या दीड वर्षांपासून विनापरवाना बेकायदेशीर डिझेल विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणात डिझेल कुठून आणले जात होते, विद्युत जोडणी कशी मिळाली आणि यामागे कोणाचा सहभाग आहे, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. या साठ्याच्या प्रकरणामुळे आंतरराज्य कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त होत असून सखोल तपासाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दोन महिन्यांपूर्वी कोंत्येव बोबलाद येथे पोलीस मध्यस्थ्यांकडून हप्ते मागितले जात असल्याच्या आरोपात ट्रक चालक व नागरिकांनी रास्ता रोको करून आंदोलन ही केले होते. मात्र त्यानंतर ठोस कारवाई न झाल्याने जतपूर्व भागात अवैध धंद्यांचे सत्र पुन्हा जोरात सुरू असल्याची चर्चा आहे.

सामाजिक अस्थैर्य वाढले, निर्भया पथक नावापूरतेच

पूर्व भागात मारामारी, अपहरण, फसवणूक, चोरी, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. व्यसनाधीनतेमुळे अनेक गुन्हे घडत असून त्याचा सर्वाधिक परिणाम तरुण पिढीवर होत आहे. समाजातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रकार, अनैतिक संबंध, बलात्कार, विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हे, कौटुंबिक वाद, भावकीतील तंटे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. शाळा व महाविद्यालय परिसरात छेडछाडीचे प्रकार वाढल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाने अधिक सक्रिय होऊन शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जतपूर्व भागात बनतायत गांजाचे अड्डे

३ जून २०१८ रोजी कारजगी येथे ७१ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतरही पूर्व भागात गांजा तस्करीचे जाळे अस्तित्वात असल्याचे चित्र आहे. कारवाई होत असली तरी ती केवळ वरवरची असून मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचत नसल्याचा आरोप जतपूर्व भागातील नागरिक करत आहेत.

करेवाडी, कोंत्येव बोबलाद, करजगी, बोर्गी खुर्द, जालिहाळ बुद्रुक, माणिकनाळ, उमदी, गिरगाव, करेवाडी (तिकोंडी) संख या गावांमध्ये अवैध दारू, बनावट दारू, सिंधी, तीन पत्ती जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलिस व प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जत तालुक्यात स्वतंत्र दोन पोलीस स्टेशन असून जत पूर्व भागात उमदी हे पोलीस स्टेशन आहे. परंतु जत पूर्व भाग हा संपूर्ण कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे अवैध धंद्यांचे ठिकठिकाणी अड्डे तयार झाले आहेत. एखादा गुन्हा केला की आरोपी कर्नाटकचा आश्रय घेऊन जवळच सीमाभागात वास्तव्य करतो, त्यामुळे पोलिसांना देखील तपासात अनेक अडथळे येतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×