Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!

नवनिर्वाचित नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट

marathinews24.com

पुणे निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धी उमेदवावर टीका करायची, मात्र त्या पलीकडे जाऊन निवडणूक संपल्यावर दोन परस्पर विरोधी निवडणूक लढवलेले उमेदवार एकमेकांना भेटतात हे अलीकडे दुर्मिळ झाले आहे.  मात्र लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ , असे म्हणत औंध – बोपोडी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट घेतली.

‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे २१ जानेवारी रोजी आयोजन – सविस्तर बातमी 

या विषयी बोलताना सनी निम्हण म्हणाले, निवडणूका येतात जातात. निवडणुकीची लढाई हि व्यक्तीशी नसून विचारांची लढाई असते असे मी मानतो. हाच विचार पुढे नेत आज निवडणुकीच्या धामधुमीनंतर  प्रकाशजी ढोरे यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी  विनायक रणपिसे उपस्थित होते.

येत्या काळात औंध बोपोडी परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण झाली. या परिसराविषयी त्यांचा ध्यास आणि कार्य पाहता पुढील काळात औंध बोपोडीच्या विकासासाठी त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. शेवटी वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी औंध बोपीडीच्या विकासासाठी आपण सर्व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यायला पाहिजे असे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे.

सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांच्या सहभागातून विकास हि स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांची शिकवण अशाच संस्कारांची नित्य प्रेरणा देत असते असेही सनी निम्हण यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×