Breking News
पोलीस अमलदारानेच उकळली 28 हजारांची खंडणी, सेवेतून निलंबितकामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिकारांजणगाव तिहेरी खूनाच्या तपास फास्ट ट्रॅकवरउद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारनवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटपलोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात !चार कोटी खर्च केलेल्या ऍथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापरचऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणारआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यलायात समन्वय बैठक

सराफ व्यावसायिकानेच रचला दरोड्याचा बनाव, अन स्वतःचे ज्वेलर्स लुटले…

धायरीतील ज्वेलर्सवर दरोड्याला भलतेच वळण चुलत भावाला हाताशी धरून स्वतःचे ज्वेलर्स लुटले

Marathinews24.com

पुणे – आर्थिक अडचणीत सापडलेल्या दुकान मालकानेच स्वतः च्या ज्वेलर्सवर चुलत भावाच्या मदतीने दरोडा टाकल्याचे उघडकीस आले आहे. धायरी परिसरातील रायकर मळा येथे खेळण्यातील बंदुकीच्या धाकाने श्री ज्वेलर्स पेढीवर पडलेल्या दरोड्याचा थरार आता बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. हा बनाव तिसरा आरोपी असलेल्या चुलत भावालाच हाताशी धरून बनाव रचल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले.

प्रकरणात तिघांना अटक

राजेश उर्फ राजू चांगदेव गालफाडे (वय ४० ) आणि श्याम शेषेराव शिंदे (वय ३७ रा. दोघेही रा. लांडेवाडी, झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सराफाने नांदेडसिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आता सराफही गोत्यात आला आहे. धायरी तील काळूबाई चौकात असलेल्या श्री ज्वेलर्समध्ये मंगळवारी (दि. १५) ग्राहकांची वर्दळ कमी असताना, तीन अनोळखी व्यक्ती शिरल्या होत्या. त्यांनी दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगाराला पिस्तूलचा धाक दाखवत २२ तोळे सोन्याचे दागिने लांबवले. पळून जात असताना कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केला असता, त्यांच्या हातातील पिस्तूल खाली पडले होते. आरोपींनी दुचाकीवरून पलायन केले.

लोणावळ्याजवळ अवजड ट्रक चालकाने ५ वाहनांना उडवले – सविस्तर बातमी

दरम्यान, सराफ दहिवाल याच्यावर २० ते २५ लाख रुपयांचे देणे थकले होते. त्यामुळे देणेकऱ्यांकडून सहानुभूती मिळावी आणि काही काळाची उसंत मिळावी याउद्देशाने त्याने स्वतःच्या दुकानावर बनावट दरोडा घडवून आणला. यासाठी प्लास्टिक पिस्तुलाचा वापर केला होता.

आर्थिक अडचणीत सापडल्याने दरोडा टाकण्याचे केले प्लॅनिंग

पोलिस तपासात सुरुवातीला हा प्रत्यक्ष दरोडा वाटत असला, तरी गुन्हे शाखेने सखोल तपास करताना दोन आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी आश्चर्यचकित करणारी माहिती दिली. हे कृत्य त्यांनी सरळ कुणाच्यातरी सांगण्यावरून केले होते. यानंतर पोलिसांनी त्या तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, तो सराफ व्यावसायिक विष्णू दहिवाल याचाच चुलत भाऊ असल्याचे समोर आले. चौकशीत त्याने कबुली दिली की, आर्थिक अडचणीत सापडलेल्या दहिवालनेच त्याला हे नाटक रचण्यास सांगितले होते.

असा घातला नियोजित दरोडा

धायरीतील रायकर मळा परिसरात श्री ज्वेलर्समध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दहिवाल आणि त्यांच्या दुकानातील कामगार शॉपमध्ये होते. त्यावेळी चोरट्यांपैकी एकाने ज्वेलर्समध्ये शिरून सोन्रुाची चैन दाखवा, असे म्हणत दागिने खरेदीचा बहाणा केला. त्यानुसार दुकानमालक दहिवाल हे त्याला सोन्याची चैन दाखवत असताना, दोघा चोरट्यांनी शॉपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिघांनी मिळून ज्वेलर्स मालक दहिवाल यांना पिस्तुलचा धाक दाखवून धमकी दिली. शिवीगाळ करीत २५ ते ३० तोळे सोन्याचे वेगवेगळे दागिने ताब्यात घेतले.

दुकान मालक दहिवालने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर पिस्टलच्या बटने मारहाण करून चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान चोरट्यांपैकी एकजण ३५ वर्षाचा असून त्यांच्या अंगात लाल रंगाचे हाफ टी शर्ट, निळी जीन्स पॅन्ट आहे. दुसरा चोरटा अंदाजे २५ वयाचा असून, फुल काळा टी-शर्ट गोल गळ्याचा, डोक्यामध्ये काळया रंगाची टोपी, तोंडावर मास लावलेला, काळया रंगाची पॅन्ट असा वेश परिधान केला होता. तिसर्‍या चोरट्याचे अंदाजे वय २५ असून, त्याने क्रीम रंगाचा फुल भायाचा गोल गळ्याचा टी-शर्ट, पांढर्‍या रंगाची जीन्स पॅन्ट, पांढरे शूज डोक्यामध्ये खाते रंगाची कॅप, पाठीवरती काळया रंगाची बॅगवरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत सराफाचे बिंग फुटले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top