बारामतीकर काका-पुतण्याचा कार्यकर्ता असल्याचे भासवून केली फसवणूक
marathinews24.com
पुणे – इलेक्ट्रीशियने स्वत:ला बडा बांधकाम व्यावसायिक असल्याचे दुकानदाराला भासवत तब्बल ८५ हजाराचे ब्रँडेड गॉगल खरेदी केले. मात्र पैसे देतेवेळी स्वतः च्या कार्यालयात ईडीचा छापा पडल्याचे सांगत धनादेश देऊन तो निघुन गेला. तसेच त्याने शरद पवार आणि अजित पवार यांची ओळख असल्याचे सांगत धनादेश दुकानदाराला दिला होता. मात्र, धनादेश बाऊंन्स झाल्याने त्याचे पितळ उघडे पडले असून याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीशियनवर गुन्हा दाखल झाला आहे.सिध्दार्थ पाटील-झेंडे (रा.बाणेर गाव, बाणेर) याच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. दुकानमालक आदिनाथ गोविंद मोरे (रा.बालेवाडी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे.
ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पकडले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मोरेचे बालेवाडी फाटा परिसरात चष्म्याचे दुकान आहे. २० एप्रिलला एकजण कडक खादीचे कपडे घालून आला. त्याने स्वत:चे नाव सिध्दार्थ झेंडे पाटील असे सांगितले. त्याने तो बांधकाम व्यावसायिक असून जे डब्यल्यु मॅरिट येथे तो स्पिच देत असल्याचे सांगितले. त्याने दोन चष्म्याची ऑर्डर दिली. त्यानंतर त्याने स्वत:साठी ,पत्नीसाठी आणि मित्र-मैत्रिणींसाठी रे बन, वोग, स्कॉट, लंडन बॉईज तसेच दोन कॉन्टॅक्ट लेंन्सचे बॉक्स अशी ८५ हजार रुपयांची खरेदी केली. बिल देताना त्याचे जीएसटी नंबरवर सिध्दार्थ झेंडे असे नाव येत होते. त्यावेळी त्याने ईडीची रेड पडली असून सर्व प्रॉपर्टी जप्त केली आहे. त्यामुळे सर्व पैसे धनादेशाव्दारे देणार असल्याचे सांगितले. मात्र मोरे यांनी ते धनादेश घेण्यास नकार दिला. तेव्हा त्याने तो बारामतीचा असून शरद पवार आणि अजित पवार यांची ओळख सांगितली. यावर विश्वास ठेऊन मोरे यांनी धनादेश घेतला. हा धनादेश भरल्यावर बँकेने बॅलंन्स कमी असल्याचा मेसेज पाठवला. त्याचा स्क्रीन शॉट सिध्दार्थला पाठवला असता, त्याने तो पाहिला नाही तसेच कॉलही उचलले नाही. यानंतर मोरे यांचा नंबर ब्लॉक केला.
कॅब चालकांसह मेडिकल दुकानदारालाही घातली टोपी
मोरे यांच्या दुकानात तो ज्या कॅबमधून आला होता, तो कॅब चालक मनोज कुमार त्यांना भेटला. त्याने सांगितले की सिध्दार्थ पाटील दोन दिवस त्याच्या कॅबमधून फिरला. त्याने विश्वास संपादन करुन माझ्याकडून फोन रिचार्ज करुन घेतला तसेच जेवणाचे बिलही घेतले असा २१ हजाराचा गंडा घातला. तर दुसरा कॅब चालक ऋषीकेश कोंडावर यालाही दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून १५ हजार बिल थकवले. तर मेडिकल मधूनही सुकामेवा, हेअर ड्रायर आणि औषधे घेऊन पाच हजाराची फसवणूक केली. सिध्दार्थ पाटीलचे कारनामे लक्षात येताच मोरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके करत आहेत.