Breking News
डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मार्केट यार्डातील दुकानातून तेलाचे डब्बे चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७२ वर्षीय व्यापारी महर्षीनगर भागात राहायला आहेत. त्यांचा मार्केट यार्डात खाद्यतेल विक्रीचा व्यापार आहे. महावीर सेल्स काॅर्पोरेशन नावाचे त्यांचे दुकान आहे. चोरट्यांनी २८ जून रोजी मध्यरात्री दुकानातील लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील खाद्यतेलाचे डब्बे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरलेल्या तेलाच्या डब्ब्यांची किंमत १२ हजार रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक भापकर तपास करत आहेत.

बिबवेवाडीतील दुकानातून सौंदर्य प्रसधनांची चोरी

बिबवेवाडीतील एका सौंदर्यप्रसाधने विक्री करणाऱ्या दुकानातून सौंदर्यप्रसधानांच्या बाटल्या चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी राहुल उर्फ राकेश ओमप्रकाश तोमर, रामपाल जयकरण पाल (दोघे रा. भाईंदर, जि. ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे बिबवेवाडीत कृष्ण काॅस्मेटिक्स हे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून ४ हजार ९०० रुपयांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या बाटल्या चोरुन नेल्या. पोलीस हवालदार सावल तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×