स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची १ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आमीर शेख (रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुलीचा बनावट जन्मदाखला करुन बँकेत खाते – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याच्याशी फिर्यादीची ओळख झाली होती. आरोपीने त्यांचा मुलगा आणि सुनेला पुणे महापालिकेत नाेकरी लावण्याचे आमिष दाखविले. नोकरी लावण्यासाठी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने आरोपीला रोख स्वरुपात वेळोवेळी दोन लाख ८६ हजार रुपये दिले. नोकरी न लावल्याने त्यांनी आरोपीकडे पैसे परत करण्याची मागणी केली. आरोपीने त्यांना एक लाख १८ हजार रुपये दिले. त्यांना उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.


























