Breking News
डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण

घरफोडीतील आंतरराज्य टोळीला अटक, ९ गुन्हे उघड

घरफोडीतील आंतरराज्य टोळीला अटक, ९ गुन्हे उघड

११ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात घरफोडी करणार्‍या आंतरराज्या टोळीला गुन्हे शाखेच्या दरोड व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे ८ आणि वाहनचोरी असे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच रोकड, मोबाइल, दुचाकी , सोन्याचे दागिने असा ११ लाख ११ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. धनंजय हरिष काळे (वय २१ रा. पिंपळे गुरव, पिंपरी) यश उर्फ गोट्या दत्ता देशमुख (वय १९ रा. भारतनगर, पिंपरी) यांना अटक केले आहे. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच चोरीचा ऐवज स्वीकारणार्‍या मोहन नागनाथ नवले (वय ३९, रा. पिंपरी) यालाही ताब्यात घेतल आहे.

मैत्रिणीशी झालेल्या वादातून आई, चुलतभावावर हल्ला – सविस्तर बातमी 

कोथरूडमधील घरफोडीच्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक तपास करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार साई कारके व महेश पाटील यांना गुन्ह्यातील आरोपी खडकीत असून ते गोव्याला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून धनंजय काळे, यश देशमुख यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कोथरूडमध्ये दोन, बिबवेवाडी, सहकारनगर, दिघीमध्ये प्रत्येकी एका, संजयनगर (सांगली) तीन, वापी गुजरात एक असे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसर, एसीपी शंकर खटके, पोलीस निरीक्षक मारूती खेडकर, एपीआय नाथा भुजबळ, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, साधना पवार, अमित गद्रे, बाळू गायकवाड, नारायण बनकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×