Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

सैनिक कल्याण विभागाअंतर्गत लाभांचे विभागीय आयुक्त शीतल तेली यांच्या हस्ते वितरण

सैनिक कल्याण विभागाअंतर्गत लाभांचे विभागीय आयुक्त शीतल तेली यांच्या हस्ते वितरण

माजी सैनिक, विधवा आणि पाल्यांना विविध योजनांचे धनादेश प्रदान

marathinews24.com

पुणे – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिकांच्या पाल्यांना विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते त्यांच्या दालनात लाभांचे धनादेश वितरीत करण्यात आले. या सर्व योजना सशस्त्र सेना ध्वजदिन निधीतून राबविण्यात येत असून ध्वजदिन निधीसाठी सढळपणे योगदान द्यावे, असे आवाहन तेली यांनी केले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधी देणार– मंत्री उदय सामंत – सविस्तर बातमी  

यावेळी ९ लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. यामध्ये बचत गट आर्थिक मदतीचा चौथा हप्ता योजनेंतर्गत बारामती येथील गंगोत्री माजी सैनिक महिला बचत गटाला रुपये २ लाख रुपये, सैन्य सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकांच्या अवलंबितांना सदनिका खरेदी करीता आर्थिक सहाय योजनेत निता सचिन फडतरे यांना रुपये २ लाख रुपये, सैन्य सेवेत असताना २३ टक्के अपंगत्व आलेल्या सैनिकास मदत योजनेत वसंत दत्तात्रय कानडे यांना रुपये ४९ हजार, १०० टक्के अपंगत्व आलेल्या सैनिकांना मदत योजनेत नारायण किसन थोरात यांना रुपये ७५ हजार, माजी सैनिकास स्वयंरोजगारासाठी मदत योजनेत राजाराम मारुती मोहिते यांना रुपये ३ लाख रुपये, माजी सैनिकास सदनिका खरेदी करीता अजित ज्ञानदेव सणस व आवटे अशोक यशवंत यांना रुपये ५० हजार व संतोष नारायण शिंदे यांना रुपये १ लाख रुपये तसेच पाल्य परदेश शिक्षण घेत असलेल्या माजी सैनिकास आर्थिक मदत योजनेंतर्गत रामदास नारायण पालेकर यांना १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत यांनी कळविली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×