Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

केजमधील घरफोडीचा २४ तासांत पोलिसांनी लावला छडा

केजमधील घरफोडीचा २४ तासांत पोलिसांनी लावला छडा

आरोपी जेरबंद, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील केज शहरातील फुलेनगर परिसरात माजी सैनिकाच्या घर व दुकानात झालेल्या ५ लाखांहून अधिकच्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावला. आरोपीला बेड्या ठोकून अटक केली आहे . त्याच्याकडून रोकड, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

फुलेनगर येथील माजी सैनिक दिनकर देविदास विडेकर यांचे घर व दुकान आहे. त्यांचा मुलगा गजानन व्यवसायानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असल्याने दिनकर विडेकर व त्यांच्या पत्नी शशिकला २७ जुलैला बाहेरगावी गेल्या होत्या. परत येण्यास विलंब झाल्याने ते तेथेच मुक्कामी थांबले. याच संधीचा फायदा घेत २८ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी चॅनल गेटसह हॉलचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून गल्ल्यातील ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच घरातील किचनमध्ये ठेवलेली ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, अडीच तोळ्यांचे सोन्याचे मणी गंठण, चांदीचे दोन ग्लास, दोन वाट्या आणि चांदीची चैन असा १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवजही लंपास केला. चोरीत ५ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. याप्रकरणी दिनकर विडेकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८१/२०२६ दाखल केला. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने तपास करत होते. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ऋषिकेश दिलीप काळे (रा. फुलेनगर, केज) यास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस हवालदार बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, महेश जोगदंड, जफर पठाण आणि चालक गणेश मराडे यांच्या पथकाने आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×