Breking News
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यूबिबवेवाडीत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीवाघोलीत महावितरणचा ट्रान्सफाॅर्मर चोरीबुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदलशेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसायबर चोरट्यांचा पुणेकरांना दणका, ३ घटनांमध्ये ७६ लाखांची फसवणूकएटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूकयेरवड्यातील तारकेश्वर पुलाचे दुरस्तीचे कामपुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागूपुणे : मंडप साहित्य केंद्रातून दोन लाखांची चोरी 

पीएमपीएल बसप्रवासात सोन्याच्या पाटल्या चोरीला

पुण्यातील पीएमपीएल बसप्रवास नको गं बाई, महिलांचे दागिने चोरणारी टोळी सुसाट...

गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या पाटल्या लंपास

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागातून पीएमपीएल बसने प्रवास करणार्‍या महिलांना चोरट्यांनी अक्षरशः वेठीस धरले असून, जेष्ठ महिलांसह नोकरदार महिलांना लक्ष्य केले जात आहेत. त्यामुळे बसमधून प्रवास करावा की नाही, अशी द्विधा मनस्थिती अनेकांची झाली आहे. मागील काही दिवसांपासून बसप्रवासात महिलांचे दागिने चोरणे, पिशवीतील ऐवजाची चोरी करणे, हातातील सोन्याच्या पाटल्या कापून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, चोरट्यांना अटकाव कधी केला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे : सराईत दुचाकी चोरट्याला अटक, दोन दुचाकी जप्त – सविस्तर बातमी

पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ९० हजार रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्या आहेत. ही घटना ६ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास खडकी पोस्ट ते नातूबाग प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी सहकानगर परिसरात राहणार्‍या ७० वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बसप्रवासात वारंवार प्रवाशांचे दागिने चोरीच्या घटनांमुळे प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून आले आहे.

तक्रारदार महिला सहकारनगरमध्ये राहायला असून, ६ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास खडकी पोस्ट ते नातूबाग असा बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील सोन्याच्या पाटल्या कापून नेल्या. ९० हजार रूपये किंमतीच्या दोन पाटल्या चोरून नेल्याचे दिसून आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार बजरंग पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top