Breking News
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यूबिबवेवाडीत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीवाघोलीत महावितरणचा ट्रान्सफाॅर्मर चोरीबुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदलशेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसायबर चोरट्यांचा पुणेकरांना दणका, ३ घटनांमध्ये ७६ लाखांची फसवणूकएटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूकयेरवड्यातील तारकेश्वर पुलाचे दुरस्तीचे कामपुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागूपुणे : मंडप साहित्य केंद्रातून दोन लाखांची चोरी 

शेअरच्या बदल्यात दिला थोडा नफा, नंतर २६ लाखांचा घातला गंडा

शेअर बाजाराचे आमिष दाखवून फसवणूक

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी नागरिकांना वेठीस धरून ऑनलाईनरित्या लुटीचे सत्र कायम असून, विविध स्वरूपाचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. अशीच एक घटना लोहगावमध्ये घडली असून, सायबर चोरट्यांनी तरूणाला शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याबदल्यात काही रकमेचा परतावा त्यांना दिला. त्यामुळे विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने तब्बल २६ लाख रूपये ऑनलाईनरित्या गुंतविले. मात्र, सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा न देता फसवणूक केली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात सोन्याच्या पाटल्या चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगावमधील साठे वस्ती परिसरात राहायला आहेत.२८ मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना एक लिंक पाठवून मोबाइल अ‍ॅप्लीकेशनद्वारे शेअर्स विकत घेण्यास सांगितले. त्याबदल्यात सुरूवातीला सायबर चोरट्यांनी त्यांना काही प्रमाणात नफा ऑनलाईनरित्या वर्ग केला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसल्यामुळे तक्रारदाराने गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. अवघात १८ दिवसांत तब्बल २६ लाखांची गुंतवणूक केल्यानंतरही सायबर चोरट्यांनी त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र, संशय आल्यामुळे त्यांनी गुंतवणूकीचा परतावा देण्याची मागणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने विमानतळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top