Breking News
पुणे पोलीस आयुक्तांनी डीजेंना वाजवले, डेसिबलही तपासलेमतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्नपुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी!आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरतीलोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीपबंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेशपुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटकचाकण परिसराची कचराकोंडी फुटली; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्पप्रतिगामी शक्तींच्या विरोधात पेटून उठण्याची गरज: उल्हास पवार

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!

Lonavala Glass Skywalk

लोणावळा येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला जिल्हास्तरीय समितीकडून गती!

marathinews24.com

पुणे – लोणावळ्याला येणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरणाऱ्या कुरवंडे परिसरातील टायगर आणि लायन्स पॉईंट येथे प्रस्तावित १२५ मीटर लांबीच्या बहुप्रतीक्षित ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला आता मोठी प्रशासकीय गती मिळाली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या निविदेचा मसुदा अंतिम करण्यात आला असून, लवकरच यासाठी ‘आरएफपी’ (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.

महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीप – सविस्तर बातमी 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि. २०) पार पडलेल्या निविदा छाननी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी उपस्थित होते. बैठकीत पीपीपी तत्त्वावरील निविदेच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हा मसुदा पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यास तसेच मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकल्पाला आवश्यक तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून, दर विश्लेषणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत अंतिम तांत्रिक मान्यतेसह प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

‘पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ परिसर विकास’ योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात २३ मीटर लांबीच्या ‘कँटिलीव्हर’ भागासह १२५ मीटर लांबीच्या काचेच्या पुलाचा समावेश आहे. याशिवाय, पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, व्ह्यूइंग गॅलरी, भव्य रेस्टॉरंट, आधुनिक पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र वीज उपकेंद्र, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि परिसराचे व्यापक सुशोभीकरण केले जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×