Breking News
चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघातससून रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूकपाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमीभारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

महिला नेतृत्वाला अधिक बळ मिळावे, श्री गणरायाच्या चरणी साकडे : डॉ. नीलम गोऱ्हे

महिला नेतृत्वाला अधिक बळ मिळावे, श्री गणरायाच्या चरणी साकडे : डॉ. नीलम गोऱ्हे

वरळी मुंबई येथील ‘बसंत-पार्वती’ ते पुणे ‘सिल्व्हर रॉक्स’ पाच दशकांहून अधिक काळ जपली जाते घरगुती गणेशोत्सवाची परंपरा

marathinews24.com

पुणे – शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मॉडेल कॉलनी येथील ‘सिल्व्हर रॉक्स’ निवासस्थानी श्री गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि गणेशभक्त उपस्थित होते.

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती – सविस्तर बातमी 

याप्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आमच्या जुन्या मुंबई वरळी येथील ‘बसंत-पार्वती’ निवासस्थानी सुरू झालेली घरगुती गणेशोत्सवाची परंपरा आता ‘सिल्व्हर रॉक्स’ येथेही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. सन १९७४ पासून, म्हणजेच पाच दशकांहून अधिक काळ आमच्या घरात श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. या परंपरेचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.”

गणेशोत्सवामुळे समाजात उत्साह, सकारात्मकता आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणणारा हा आनंदाचा उत्सव आहे. आमचे कुटुंब छोटे असले तरी नव्या पिढीच्या सहभागामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला असून, घरातील ही परंपरा पुढील पिढीकडूनही जपली जात असल्याचे समाधान असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी राज्याच्या आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची अधिक वेगाने प्रगती व्हावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर व्हावा, अशी प्रार्थना त्यांनी केली.

ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर महिला नेतृत्वाला मिळत असलेल्या महत्त्वाचा उल्लेख करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राजकीय, सामाजिक आणि नागरी क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभाग वाढणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत समान संधी आणि नेतृत्वाची जबाबदारी मिळाली पाहिजे. महिलांचे राजकीय आणि सामाजिक नेतृत्व अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेतही सविस्तर चर्चा करण्यात आली.”

“श्री गणरायाच्या कृपेने राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांना सुखी, निरोगी, सुरक्षित आणि समृद्ध आयुष्य लाभो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आरोग्य उत्तम राहो आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आनंद, समाधान आणि सलोखा नांदो,” अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

घरगुती गणेशोत्सवाच्या आयोजनामध्ये डॉ. गोऱ्हे यांच्या भगिनी जेहलम जोशी यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. गणेशोत्सवासाठी योगदान देणारे मूर्तिकार, कलाकार, सजावटकार, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मेहनतीचेही डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक केले.

पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर डॉ. गोऱ्हे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी गणेशदर्शनासाठी निमंत्रित केले असून, त्यांच्या निवासस्थानीही त्या श्री गणरायाचे दर्शन घेणार आहेत.

अखेरीस डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत सामाजिक सलोखा, परस्पर सहकार्य, पर्यावरण संवर्धन आणि सेवाभावाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×