Breking News
चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघातससून रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूकपाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमीभारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

महिलेसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बेकायदा पथारी व्यावसायिकांवर कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना मंडई परिसरात घडली. या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद जक्शी वाघिरे (वय ३०), निशा घनश्याम वाघिरे (वय २५), रामजी घनश्याम वाघिरे (वय २२, रा. तिघे रा. महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट, जुना मुंबई-पुणे रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अतिक्रमण विभागातील कर्मचारी नीलेश चव्हाण (वय ४३, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य भागात बेकायदा पथारी व्यावसायिकांविरुद्ध अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. महात्मा फुले मंडई परिसरातील गोटीराम भैय्या चौकात बेकायदा पथारी व्यावसायिकांविरुद्ध १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कारवाई करण्यात आली. त्या वेळी बेकायदा पथारी मांडून व्यवसाय करणारे वाघिरे यांनी कारवाईस विराेध केला. जप्त केलेला माल गाडीत ठेवण्या आला होता. आरोपींनी गाडीत ठेवलेला माल रस्त्यावर फेकून दिला, तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. अजय भिसे यांना लाथ मारुन शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.

पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावला

पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना छत्रपती शिवाजी पुलावर घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय तरुण रांजणगाव परिसरात राहायला आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तो शनिवार वाडा परिसरातून छत्रपती शिवाजी पुलाकडे निघाला होता. पुलाजवळ त्याला एका चोरट्याने अडविले. संपर्क साधण्यासाठी मोबाइल मिळेल का ? अशी विचारणा चोरट्याने तरुणाकडे केली. तरुणाने त्याला नकार दिला. तरुणाचे लक्ष नसल्याची संधी चोरट्याने साधली. तरुणाकडील दहा हजारांचा मोबाइल हिसकावून चोरटा पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×