येरवड्यात दोन गटात हाणामारी, चौघांना अटक

किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार

धक्का लागल्याच्या कारणावरून वाद; तलवारी, फायटर घेऊन हाणामारी

marathinews24.com

पुणे – धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन दोन गटात बेदम हाणामारी झाल्याची घटना १४ सप्टेंबरला रात्री पावणेआठच्या सुमारास येरवड्यातील डायमंड चौकात घडली. हाणामारी करताना टोळक्याने तलवारी, फायटर बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलीस कायदा कलमानुसार लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस प्रवासात तरुणाचा मोबाइल चोरीला – सविस्तर बातमी

शिवम राजू ढेंबरे (वय २२ रा. प्रतीकनगर) शुभम वशिष्ठ तिवारी (वय २२ रा. येरवडा) सोहेल समीर खान (वय २२, रा. भोसले वस्ती, येरवडा) शुभम शाम पोळ (वय २५ रा. भोसले वस्ती, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चार साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अमलदार किरण भागीत यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी येरवड्यातील असून, त्यांच्यात किरकोळ कारणावरुन १४ सप्टेंबरला वादविवाद सुरू झाले. धक्का लागल्यामुळे दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली होती. तेव्हा आरोपींनी हातात तलवारी, फायटर बाळगल्याचे दिसून आले. याप्रकरणी सरकारच्यावतीने अमलदाराने आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×