Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी ज्येष्ठउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

marathinews24.com

मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. ते ७५ वर्षाचे होते. गोव्यातील आपल्या घरी असताना त्यांना हृदय विकाराचा धक्का बसला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण सिने कलाकार, फिल्म इंडस्ट्री, चाहत्यांना धक्का बसला असून, अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉस – सविस्तर बातमी

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील.

नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील आपुलकीच्या संबंधांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्या. नानांचे आदरणीय अजित दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे,” असे त्या म्हणाल्या.

अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही नानांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू दिले नाही. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील वंचित घटक, दुष्काळग्रस्त आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.कलेचा आणि सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेल्या या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×