Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Miyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण

मियावाकी वन, Miyawaki Forest, आळंदी, Alandi, सिद्धबेट, Siddhabet, वृक्षारोपण, Tree Plantation, 5 हजार रोपे, 5000 Saplings, सेवा संकल्प अभियान, Seva Sankalp Abhiyan, पर्यावरण संवर्धन, Environmental Conservation, हरित आळंदी, Green Alandi, CSR Initiative

पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्रवाढीला चालना

marathinews24.com

पुणे – Miyawaki Forest Alandi : महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सिद्धबेट, आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे – सविस्तर बातमी 

हा उपक्रम वोडाफोन इंटेलिजंट सोल्युशन्स यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत राबविण्यात आला असून, वोडाफोन आयडिया फाउंडेशन यांनी या उपक्रमाची संकल्पना व अंमलबजावणी केली आहे. तसेच इंडिव्ह कन्सल्टन्सी यांनी अंमलबजावणी भागीदार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशी माहिती माधव खांडेकर मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांनी दिली.

मियावाकी वनाची संकल्पना

Miyawaki Forest Alandi सिद्धबेट परिसरात विकसित करण्यात येत असलेले हे मियावाकी वन अल्प जागेत कमी कालावधीत दाट, स्वयंपूर्ण आणि स्थानिक जैवविविधतेने समृद्ध जंगल निर्माण करण्याच्या उद्देशाने उभारले जात आहे. या पद्धतीत स्थानिक वृक्षप्रजातींची दाट लागवड केली जाते, त्यामुळे झाडांची वाढ वेगाने होते आणि काही वर्षांत नैसर्गिक जंगलासारखी समृद्ध वनराई विकसित होण्यास मदत होते.

या वनाचा उद्देश शहरातील हरित क्षेत्र वाढविणे, कार्बन डायऑक्साइड शोषून हवेची गुणवत्ता सुधारणे, पक्षी, फुलपाखरे व इतर जीवांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण करणे, शहरी तापमान कमी करणे तसेच ध्वनी व धूळ प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणे हा आहे. भविष्यात हे वन कमी देखभालीत टिकणारे स्वयंपूर्ण पर्यावरणीय क्षेत्र म्हणून विकसित होणार आहे.

लोकसहभागातून साकारलेला उपक्रम

या महत्त्वपूर्ण सीएसआर उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी हितेश वधवानी यांनी विशेष पुढाकार घेत समन्वयाची भूमिका पार पाडली. वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प केला आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे जतन करण्याचे आवाहन केले.

सिद्धबेट, आळंदी येथे विकसित होणारे हे मियावाकी वन भविष्यात शहरासाठी हरित फुफ्फुस (Green Lung) ठरणार असून, स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक आळंदी घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×