Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

Baramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात

Baramati Crop Panchnama

३ हजार ९६६ खातेदारांच्या २ हजार २५२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

marathinews24.com

बारामती – Baramati Crop Panchnama : महाराष्ट्र शासनाच्या विस्तार व प्रशिक्षण विभाग, कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार सन २०२६-२७ मधील खरीप हंगामासाठी बारामती तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील ११९ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण – सविस्तर बातमी 

पंचनाम्याच्या कामासाठी तहसील कार्यालयातील ५६ ग्राम महसूल अधिकारी, तालुका कृषी कार्यालयातील ४३ सहायक कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती बारामती कार्यालयातील ७० ग्रामपंचायत अधिकारी अशा एकूण १६९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Baramati Crop Panchnama बारामती तालुक्यात खरीप हंगामातील आतापर्यंत ३ हजार ९६६ खातेदारांच्या २ हजार २५२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रातील पंचनाम्याचे कामही सुरू असून, शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पिकांचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×