आता दिवसासोबत संध्याकाळचीही रंगत
marathinews24.com
पुणे – Glow Garden Lonavala : लोणावळ्यातील पर्यटनाला आता रात्रीच्या मनोरंजनाची नवी जोड मिळणार आहे. वेट’एन जॉयने आपल्या परिसरात ‘ग्लो गार्डन’ सुरू केले असून, एकाच ठिकाणी वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्क आणि संध्याकाळचा अलौकिक अनुभव अशी तीन वेगवेगळी आकर्षणे पर्यटकांना अनुभवता येणार आहेत. महाराष्ट्रातील या स्तरावर आणि अशा प्रकारचा हा पहितेच ग्लो गार्डन असणार आहे.
सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यक ; पुण्यात राष्ट्रीय सल्लामसलत – सविस्तर बातमी
दिवसभर वॉटर पार्क आणि अम्युझमेंट पार्कमधील राइड्सचा आनंद घेतल्यानंतर सूर्यास्तानंतर परिसराचे स्वरूप बदलणार आहे. विविध रंगांच्या प्रकाशयोजना आणि मोठ्या आकाराच्या प्रकाशमान कलाकृतींनी सजवलेल्या ग्लो गार्डनमध्ये निसर्ग, प्राणी आणि कल्पनाविश्वावर आधारित रचना साकारण्यात आल्या आहेत. Glow Garden Lonavala प्रकाशमान मोर, फुलपाखरे, फुलांच्या रचना तसेच विविध रंगीबेरंगी प्राण्याचा संसार हे या परिसरातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
विशेषतः कुटुंबीय आणि मुलांसाठी संध्याकाळच्या वेळेत फिरता यावे, तसेच फोटो काढण्यासाठी विविध ठिकाणे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने या परिसराची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे वॉटर पार्क किंवा अम्युझमेंट पार्कचा अनुभव केवळ दिवसापुरता मर्यादित न राहता तो संध्याकाळपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वेट’ एन जॉयच्या या नव्या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना मालपाणी ग्रुपच्या संचालिका श्रेया मालपाणी म्हणाल्या, “एका ठिकाणी पर्यटकांना अद्भुत विश्वाचा अनुभव अनुभव देता यावेत, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. ग्लो गार्डनमुळे वॉटर पार्क आणि अम्युझमेंट पार्कच्या अनुभवाला संध्याकाळचा वेगळ्या वातावरणाची जोड मिळत आहे. आगामी सण आणि सुट्टीच्या काळात कुटुंबीय आणि मित्रमंडळींना एकत्र वेळ घालवण्यासाठी हा अनुभव उपयुक्त ठरेल.”
वेट’ एन जॉयमध्ये वॉटर पार्क आणि अम्युझमेंट पार्कमध्ये मिळून ६० हून अधिक राइड्स व आकर्षणे आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या वेव्ह पूलसह विविध वॉटर राइड्स आणि अम्युझमेंट राइड्सचा समावेश आहे. आता ग्लो गार्डनच्या समावेशामुळे पर्यटकांना दिवसभरातील अनुभवांसोबत संध्याकाळचा कल्पनेपलीकडचा अनुभव घेता येणार आहे.
आगामी सणासुदीचा आणि सुट्टीचा काळ लक्षात घेता कुटुंबीय, विद्यार्थी तसेच विविध ग्रुपसाठी वेट’एन जॉयकडून काही विशेष बुकिंग पर्याय आणि सवलतीही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोणावळ्याच्या एका दिवसाच्या सहलीत अधिक अनुभव सामावून घेण्याचा पर्याय पर्यटकांसमोर उपलब्ध झाला आहे.






















