Breking News
Pune Hotel Prostitution Racket : पुण्यात हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन परराज्यातील महिलांची सुटकाPune Police News : पुण्यातील २० जणांची पोलीस सुरक्षा काढलीTheur Maharshi Kaundinya Rishi Ashram : थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतातPune Girl Child Birth Ratio : ‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा-डॉ. नीलम गोऱ्हेRapido Bike Taxi Pune : पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहनMaharashtra Revenue Department : महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियानPune Crime Branch Arrest : रेकॉर्डवरील आरोपी पोलिसांच्या जाळ्यातSwargate Bus Theft Case : एसटी प्रवासात गुंगीकारक गोळ्या खाण्यास देउन प्रवाशांची लुटPune Police Farmer Aid : खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपयेEach Woman Champion Maharashtra : महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट

Maharashtra Disability Welfare Fund : दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा अजित दादांचा संकल्प आता प्रत्यक्षात

Maharashtra Disability Welfare Fund

जिल्हा वार्षिक योजनेतील एक टक्का निधीच्या वापरास मंत्रिमंडळाची मंजुरी

marathinews24.com

मुंबई – Maharashtra Disability Welfare Fund : राज्यातील दिव्यांग बांधवांचे कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत राखीव ठेवण्यात आलेल्या एक टक्का निधीच्या वापरास आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी विशेष पुढाकार घेऊन घेतलेल्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहन – सविस्तर बातमी 

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध असावा, ही दिवंगत अजितदादा पवार यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी वित्त व नियोजन मंत्री म्हणून संबंधित विभागांच्या सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकारातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५-२६ पासून नियमित योजनांसाठी अनुज्ञेय निधीमधून कमाल एक टक्क्यापर्यंत निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे या राखीव निधीचा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी प्रभावीपणे वापर करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीला गती मिळणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर दिव्यांग बांधवांच्या गरजांनुसार विविध उपक्रम आणि योजनांसाठी या निधीचा उपयोग होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, दिव्यांग बांधवांना सहानुभूती नव्हे, तर समान संधी आणि स्वावलंबनाचे बळ मिळाले पाहिजे, ही अजितदादांची भूमिका होती. त्याच विचारातून त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील एक टक्का निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. (Maharashtra Disability Welfare Fund) आज त्या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे, याचे समाधान आहे. अजितदादांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

दिव्यांग बांधवांचे शिक्षण, कौशल्यविकास, पुनर्वसन, रोजगार स्वयंरोजगार आणि स्वावलंबनाला चालना देण्याच्या दृष्टीने या निधीचा प्रभावी वापर होणार असून, दिवंगत अजितदादा पवार यांनी पाहिलेल्या सक्षम आणि सर्वसमावेशक महाराष्ट्राच्या संकल्पनेला या निर्णयामुळे आणखी बळ मिळणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×