आसाममधील तिघांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Hotel Prostitution Racket : शहरातील संगमवाडी परिसरातील हॉटेलमध्ये एजंटांमार्फत परराज्यांतील महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) उघडकीस आणला. या कारवाईत दोन परराज्यांतील पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, आसाममधील तिघांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील २० जणांची पोलीस सुरक्षा काढली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी बंडगार्डन रोडवरील एक्साइज कॉलनीजवळ असलेल्या ‘हॉटेल क्राउन प्लाझा’मध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची खातरजमा केली. त्यानंतर हॉटेलवर अचानक छापा टाकला. कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन परराज्यांतील महिलांची सुटका करण्यात आली.
रोहन ऊर्फ राजकुमार (वय ३२), विवेक ऊर्फ मयंक कबीर (वय ३४), विक्रम ऊर्फ पियुष (वय ३४, तिघेही रा. आसाम) आणि त्यांचा अन्य एक साथीदार अशा चौघांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १४३(१)(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ४ व ५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. (Pune Hotel Prostitution Racket) ही कारवाई अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक सोनाली जगदाळे/साठे, ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंढे, किशोर भुजबळ, सुरेखा आंधळे, मनीषा वायसे, फराह पठाण, वैशाली खेडेकर आणि वैशाली इंगळे यांच्या पथकाने केली.





















