Breking News
Pune Traffic News : मेट्रोच्या कामानिमित्त चांदणी चौक ते कोथरूड जड वाहनांना बंदीPune Crime News : ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन सोन्याची अंगठी चोरलीPune Accident News : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Police News : कुराशच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात १४ पोलिसांसह २५ जणांना अटकPune Fire News : कोथरूडमध्ये गॅस गळतीमुळे कामगारांच्या घराला आगPune Hotel Prostitution Racket : पुण्यात हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन परराज्यातील महिलांची सुटकाPune Police News : पुण्यातील २० जणांची पोलीस सुरक्षा काढलीTheur Maharshi Kaundinya Rishi Ashram : थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतातPune Girl Child Birth Ratio : ‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा-डॉ. नीलम गोऱ्हेRapido Bike Taxi Pune : पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहन

Pune Police News : कुराशच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात १४ पोलिसांसह २५ जणांना अटक

इतर विभागावर कारवाईची टांगती तलवार

marathinews24.com

पुणे – कुराश खेळाच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवण्याच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४ पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्‍यातील काही जणांची येरवडा कारागृहात रवानगीही झाली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या व नव्याने भरती झालेल्‍या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचाच या प्रकरणात समावेश असल्याने भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि क्रीडा आरक्षणाच्या गैरवापराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कुराशचे बोगस प्रमाणपत्र देऊन भरती झालेल्‍यांवरही कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

कोथरूडमध्ये गॅस गळतीमुळे कामगारांच्या घराला आग – सविस्तर बातमी

पुणे पोलिसांनी कुराश खेळाच्‍या बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट उध्वस्‍थत करत महत्‍वाचे धागेदोरे उघड केले आहेत. याप्रकरणात अंकुश नागर, शिवाजी साळुंखे, त्रिवेणी पुनगावकर, धैर्यशिल पुनगावकर, श्रृती पुनगावकर, शरद अंदुरे प्रशांत साळुंखे, कुमार उपाध्याय दत्‍तु व्यवहारे, चांद शेख यांना अटक करण्यात आली आहे. तर कुराशच्‍या बोगस प्रमाणपत्राद्वारे पोलिस प्रशिक्षणाला गेलेले प्रकाश सोडनर, समीर गायकवाड, दत्‍ता सदामते, रोहित गायकवाड, विशाल टेंगळे, रंजित मसलखांब, ऋतुराज पवार, अभिजीत किन्होळे यांना अटक झाली. तर ट्रेनिंगला न गेलेले पण पोलिस असलेले प्रथमेश मोरे, ज्ञानेश्र्वर इंडोळे, चंद्रकांत शिंदे, मोहमंद जाफर फनीबंद बोगस प्रमाणपत्राद्वारे पोलिस झालेल्‍या पण ट्रेनिंगला न गेलेल्‍या चार जण अशा 25 जणांना अटक करण्यात आली आहे. तर अर्जुन भगुरे, गोविंद नरवटे, दयानंद गुट्टे, भारत कदम, आरती पाटील, शिवररण माने यांचा पोलिस शोध घेत आहे. तर त्‍यातील एकाचा गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर ऋदय विकाराच्‍या झटक्‍याने निधन झाले.

कुराश खेळातील क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर करून शासकीय सेवेत प्रवेश मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात स्पर्धांमध्ये सहभाग नसतानाही बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्यात आल्याचा संशय तपासातून पुढे आला आहे. या प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचाही तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे. खऱ्या खेळाडूंवर अन्याय झाल्याचा मुद्दा क्रीडा क्षेत्रात मेहनत घेऊन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीत संधी मिळावी, यासाठी क्रीडा आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे या आरक्षणाचा लाभ घेतला जात असल्याचे समोर आल्याने पात्र खेळाडूंवर अन्याय झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

अशा प्रकारांमुळे भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या अन्य व्यक्तींचा सहभाग तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कुराश प्रमाणपत्राच्‍या आधारे इतर विभागातही भरती झालेल्‍यांची जी नावे समोर आली आहेत. त्‍या संबंधीत विभागाला त्‍या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांकडून पत्र व्यवहार केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×