सहकारनगर भागातील घटना
marathinews24.com
पुणे – वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सहकारनगर भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विश्वनाथ महादू शिरसाठ (वय ५१, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत शिरसाठ यांचा पुतण्या मंगेश शेखर कसबे (वय ४३, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कुराशच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात १४ पोलिसांसह २५ जणांना अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास शिरसाठ हे सहकारनगर क्रमांक दोन परिसरातून निघाले होते. पाटे संस्कृती इमारतीजवळील रस्त्याने ते निघाले होते. त्या वेळी अंधारात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर पादचारी शिरसाठ यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता वाहन चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या शिरसाठ यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.




















