जड वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – शहरातील वनाज ते रामवाडी दरम्यान असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या पुढच्या टप्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वनाज ते चांदणी चैाक दरम्यान मेट्रो मार्गिकेच्या कामानिमित्त दुभाजकाच्या दोन्ही बाजूस लोखंडी कठडे (बॅरिकेटिंग) लावण्यात येणार आहे. चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या जड वाहनांसह एसटी बस, खासगी प्रवासी बसला बंदी घालण्यात आली आहे. जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन सोन्याची अंगठी चोरली – सविस्तर बातमी
‘वनाज मेट्रो स्थानक ते चांदणी चौक दरम्यान विस्तारित मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. वनाज ते चांदणी चौका दरम्यान दुभाजकाजवळ दोन्ही बाजूस लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. चांदणी चौकातून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार आहे. या रस्त्यावर प्रथमेश एलिट सोसायटीसमोर जड वाहनांना अडथळा निर्माण करण्यासाठी उंचीवर लोखंडी कठडा (हाईट बॅरिअर) बसविण्यात येणार आहे. चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जड वाहने (डंपर, मिक्सर, मालवाहू वाहने), तसेच एसटी बसचालक, प्रवासी बस चालकांनी चांदणी चौकातून कोथरूड डेपोकडे न जाता. पर्यायी मार्गाचा वापर करावा. जड वाहने, बस चालकांनी चांदणी चौक, डुक्कर खिंड, वारजे, कर्वेनगर, कर्वे रस्ता, पौड फाटा चौकातून इच्छितस्थळी जावे’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.





















