श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन
marathinews24.com
पुणे – Dagdusheth Ganpati Temple : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शेकडो दिव्यांनी उजळले. मंदिरातील गाभारा, सभामंडप सह कळसापर्यंत प्रज्वलित केलेल्या हजारो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर उजळून निघाले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.
भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभा – सविस्तर बातमी
Dagdusheth Ganpati Temple दरम्यान त्रिपुरी पोर्णिमेनिमीत्त मंदिरात गोड, तिखट, आंबट, खारट अशा चवींचे पदार्थ…मिठाई आणि विविध प्रकारच्या फळांचा अन्नकोट साकारत श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात लाडक्या गणरायासमोर ५५१ पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला.
ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, बळीराजावर जे संकट आले आले, ते दूर होवो आणि महाराष्ट्र व संपूर्ण भारतात सुख-शांती नांदो अशी प्रार्थना यावेळी गणरायाचरणी करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून हे पदार्थ दिले जातात.






















