Breking News
Pune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठराव

Warje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेत

पुण्यातील तुळशीबागेत मंगळसूत्र हिसकावणारी महिला अटकेत

गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवा

marathinews24.com

पुणे – Warje Crime News :गांजा विक्री करणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. महिलेकडून २९ हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. सुनीता सिकंदर भाट (वय ५५, रा. अमर भारत सोसायटी, वारजे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेेचे नाव आहे.

फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक वारजे, नांदेड सिटी भागात गस्त घालत होते. वारजे भागातील अमर भारत सोसायटी परिसरात एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस कर्मचारी तुषार किंद्रे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २९ हजार ६०० रुपये आहे. भाट हिच्याविरुद्ध वारजे माळवाडी पाेलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी भाट हिच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले होते.

अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, अर्चना वाघमारे, किशोर शिंदे, कैलास लिमण, मनोज पवार, काटकर, अमित बोडरे, आशिष राठोड, योगेश झेंडे, तुषार किंद्रे, विपुल गायकवाड यांनी ही कारवाई केली.

कोयता बाळगणारा अटकेत

धायरी परिसरात कोयता बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली.त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून दोन कोयते जप्त करण्यात आले. हेमंत पुरुषोत्तम वाणी (वय १८, रा. शिवप्रस्थ हाईट्स, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

धायरी परिसरात पोलीस कर्मचारी मनोज पवार, अमित बोडरे हे गस्त घालत होते. वाणी याच्याकडे कोयता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वाणी याच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×