नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ घडली घटना
marathinews24.com
पुणे – गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याने झालेल्या वादातून तरुणावर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली. शुभम बसवराज म्हेत्रे (वय २३, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मितेश फुलपगार (वय ५०, रा. लोकमान्यनगर, नवी पेठ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेले साथीदार हर्षल मितेश फुलपगार (वय २५) याच्यासह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत म्हेत्रे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गांजा विक्री करणारी महिला अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार म्हेत्रे आणि आरोपी फुलपगार हे ओळखीचे आहेत. म्हेत्रे याने आरोपी फुलपगार यांना गुंतवणुकीसाठी पैसे दिले होते. काही दिवसांपूर्वी म्हेत्रे याने गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे परत मागितले होते. या कारणावरुन आरोपी त्याच्यावर चिडले होते. आरोपींनी म्हेत्रे याला मंगळवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास म्हेत्रे याला एस. एम. जोशी पुलाजवळ भेटण्यासाठी बोलाविले. तेथे त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी म्हेत्रे याला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीस उपनिरीक्षख भंडारे तपास करत आहेत.





















