Breking News
मोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोको

बनावट चावीने फ्लॅट उघडून केली चोरी

पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

३ लाख १४ हजारांचा ऐवज चोरीला

marathinews24.com

पुणे – बनावट चावीने फ्लॅट उघडून चोरट्यांनी २ लाख रूपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख १४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २२ मे रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील आशरफी मस्जिल इमारतीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात पादचारी ज्येष्ठांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील आशरफी मस्जिल इमारतीत राहायला आहे. २२ मे रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास महिला कामानिमित्त बाहेर गेली होती. त्याचवेळी चोरट्यांनी बनावट चावीने तक्रारदार महिलेचा फ्लॅट उघडून आतप्रवेश केला. घरातील दोन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. महिला बाहेरून आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top