जिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात

महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात पाणंद, शिवरस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यात वनक्षेत्रात अतुलनीय अशी पर्यटनस्थळे असून त्यांचा सर्वांगीण विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यादृष्टीने पुणे वनविभागांतर्गत राजगड तसेच अन्य किल्ले, जुन्नर वनविभागांतर्गत विविध घाट, धबधबे, डोंगर आदींच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याबाबत आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

लायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड – सविस्तर बातमी

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनपर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) जयश्री पवार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई आदी उपस्थित होते.

राजगड पायथा येथे वनविभागाच्या कार्यक्षेत्रात विविध सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्या निर्माण करताना वनविभागाचे नियम, मानके लक्षात घ्याव्यात. स्थानिक दगड, माती, लाकूड आदींचा वापर करुन पर्यावरणपूरक विकास करावयाचा आहे. सीमेंट काँक्रेट किंवा अन्य बाबींचा वापर करण्यात येणार नाही. पर्यटक अधिकाधिक भेटी देतात अशी ठिकाणे निश्चित करुन त्या ठिकाणी दगडी बाकडे, शौचालये, आवश्यक त्या ठिकाणी दगडी पायऱ्यांचा वापर करुन लहान रस्ते, लाकडी बॅरिकेटिंग, रेलिंग आदी करावे. संबंधित ठिकाणांची महत्त्वाची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी सायनेजेस तयार करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात करावयाच्या कामांसाठी संबंधित विभागाची ना-हरकत घ्यावी. राजगड किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे येथे विविध सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

या विविध ठिकाणी निर्माण करावयाच्या सुविधांच्या अनुषंगाने सल्लागार संस्थेच्यावतीने यावेळी सादरीकरण करण्यात आले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी नानेघाट, दाऱ्याघाट, आंबोली, कांचन, काळू, धूरनळी धबधबे, दुर्गवाडी कोकणकडा, भिवेगाव खेड कुंड, कुंडेश्वर निसर्ग पर्यटन, शिंगेश्वर मंदीर टेकडी, भामचंद्र डोंगर, तुकाईमाता मंदीर, अरण्येश्वर मंदीर, शिरूर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी करावयाच्या पर्यटक सुविधांच्या अनुषंगाने आराखडा सादर केला.

यावेळी इको टूरिझम क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. या सूचनांचा समावेश पर्यटन स्थळांचा विकास करताना केला जाईल, असे जिल्हाधिकारी डूडी म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×