Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना नो एन्ट्री

गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना नो एन्ट्री

अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून जड वाहतुकीला बंदी

marathinews24.com

पुणे – शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सुरक्षेची उपाययोजना व रस्त्यांवरून अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होवून त्यांचे जिवीतास धोका होवू नये. तसेच शहरातील खालील ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे राहण्यासाठी वाहतूक उपायुक्त हिंमत जाधव यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून जड वाहतुकीला बंदी केली आहे. (फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळून) आदेश जारी केले आहेत.

लहानग्यांनी साकारली ‘बाप्पा’ची मूर्ती; कोथरूडमध्ये शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळा उत्साहात – सविस्तर बातमी 

शहरात २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाहतूकीस २४ तास बंदी करण्यात आली आहे. शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोड – जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रोड – शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोड – फुटका बुरुज ते अलका चौक, बाजीराव रोड – पुरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रोड – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक, जंगली महाराज रोड – स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, सिंहगड रोड – राजाराम ब्रिज ते सावरकर चौक, गणेश रोड / मुदलियार रोड – पॉवरहाऊस – दारुवाला – जिजामाता चौक – फुटका बुरुज चौकात वाहतुक बदलांचा अवलंब करावा. गणेशोत्सव शांततेने पार पाळण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×