Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

माऊलींच्या पालखी सोहळ्यात बिल्डरच्या गळ्यातील ९ लाखांची चैन चोरीला

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज

आळंदी-पुणे रस्त्यावर काळे पेट्रोल पंपासमोर घडली घटना 

marathinews24.com

पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या एका बिल्डरच्या गळ्यातील नऊ लाखांची सोन्याची चैन चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या चोराने पालखी सोहळ्यात सहभागी आठ महिला आणि एका पुरूषाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याचा संशय आहे. ही घटना शुक्रवारी आळंदी-पुणे रस्त्यावर काळे पेट्रोल पंपासमोर घडली. याप्रकरणी शैलेंद्र मोहन पाटील (वय ६०, रा. कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खिशात हात घालून रोख १५ हजार पळविले – सविस्तर बातमी 

त्यानुसार सिद्धार्थ संजय जाधव (वय २४, रा. शिरपूर, ता. शिरूर, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. गर्दीचा फायदा घेत आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील ९ लाख किमंतीची ९० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व लॉकेट चोरले. त्याचप्रमाणे आरोपीने आठ महिला आणि एका पुरूषाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेल्याचा संशय पोलिसांना आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×