Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

वाटसरू महिलेवर बलात्कार करणारा गजाआड

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

रेखाचित्रावरुन पसार आरोपीचा माग

marathinews24.com

पुणे – महिलेला दुचाकीवरुन सोडण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र पाेलिसांनी तयार केले होते. रेखाचित्रावरुन पोलिसांनी आरोपीचा माग काढला
जाक्या कोंडक्या चव्हाण (वय ३०, रा. लिंगाळी, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चव्हाण सराइत असून, यापूर्वी त्याच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. १० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पीडित महिला पुणे-सोलापूर महामार्गावर थांबली होती. ती पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबली होती.

फटाके वाजवताना झाला वाद; मारहाणीत जखमी झालेल्याचा मृत्यू – सविस्तर बातमी

भिगवण परिसरात आरोपी चव्हाण याने महिलेला दुचाकीवरुन पुण्याला सोडतो, असे आमिष दाखविले.आरोपीने माळद गाव परिसरातील रेल्वे पुलाजवळ दुचाकी थांबवली. त्यानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन झाडात ओढत नेले. त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेला अंधारात सोडून चव्हाण पसार झाला. घाबरलेल्या महिलेने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण, दौंड, तसेच स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करण्यात आली. पीडित महिलेने दिलेल्या वर्णनावरून आरोपीचे रेखाचित्र तयार केले.

दौंड, भिगवण भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपास करुन पोलिसांनी आरोपी चव्हाण याला लिंगाळी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद महांगडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×