Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्तीजवळील अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पो चालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला आहे. हा अपघात ४ जूनला रात्री अकराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्तीजवळील घडला आहे. सुरेश विठ्ठल कांबळे (वय ३३ रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल कांबळे (वय ६३ रा. कदमवाक वस्ती) यांनी फिर्याद दिली असून, लोणी काळभोर पोलिसांनी टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ईएमआयसाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विठ्ठल कांबळे यांचा मुलगा सुरेश कांबळे हा ४ जूनला रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवर घरी चालला होता. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्तीजवळील जगदंबा मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाजवळून दुचाकीवरून जात असताना भरधाव टेम्पो चालकाने त्याला पाठीमागून धडक दिली.

त्यामुळे सुरेश गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×