Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथारीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथारीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

पोलीसांची ११ पथके, महापालिकेसोबत संयुक्त कारवाई

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य भागातील वाहतूककोंडीसह गर्दी टाळण्यासाठी पथारी वाल्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. हुतात्मा बाबू गेणू चौक, मंडई परिसरात बेकायदा व्यवसाय करणार्‍या पथारी वाल्यांविरुद्ध पुणे पोलिसांच्या ११ पथकांसह महापालिकेकडून रविवारी (दि. २४ ) संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे. गर्दीचे नियोजनासह कोंडी टाळण्यासाठी कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धा उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

मध्यवर्ती भागातील मंडई, हुतात्मा बाबू गेणू चौक, शनिपार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पथारीवाले व्यवसायिकांचे प्रस्थ वाढले होते. त्यांच्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यातच गणशोत्सव असल्यामुळे वाहतूककोंडीमुळे परिसरातील बेकायदा पथारी व्यावसायिकांविरूद्ध कारवाईचा वेग वाढवला आहे. मध्यभागातील वाहतूक नियमन करणे, बेकायदा पथारी व्यावसायिकांसह बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध कारवाईवर भर दिला जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने पोलिसांनी मंडई, हुतात्मा बाबू गेणू चौक, तसेच शनिपार परिसरात पथारीवाल्यांविरुद्ध कारवाई केल्यामुळे परिसर रिकामा झाल्याचे दिसून आले.

गणशोत्सवात भाविकांची सुरक्षा, गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा ११ पथके तयार करण्यात आली आहे. संबंधित पथकांनी शुक्रवारी रात्रीपासूनच पेट्रोलिंग करीत आढावा घेतला. पथकाने मध्य भागातील विविध रस्त्यांची पाहणी करीत ज्याठिकाणीा खड्डे पडले आहेत, झाकणे तुटली आहेत, अशा कामांची माहिती महापालिका प्रशासनाला दिली. त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी त्या भागातील दुरस्तीचे कामे करुन घेतली. उत्सवात होणारी गर्दी विचारात घेऊन रस्त्यांची डागडुजी करणे, अतिक्रमण काढणे, रस्त्यांवर रंगरंगोटी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

गणेशोत्सव कालावधीत मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमााणावर भाविक दर्शनासाठी येतात. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात येत असून, रस्त्यावरील खड्डे, मलनिस्सारण वाहिनीवरील झाकणे दुरुस्तीसाठी संयुक्त मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी पोलिसांची ११ पथके महापालिकेशी समन्वय साधून विविध कामे करून घेत आहेत. – कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×