Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

हातभट्टी दारुधंद्यावर कारवाईचा बडगा

थेऊर फाटयाजवळ कारवाई

marathinews24.com

पुणे – गावठी हातभट्टी दारू धंद्यावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. थेऊर फाटयाजवळ, राखपसरे वस्ती परिसरात सुरू असलेला दारूधंदा उध्वस्त करण्यात आला. त्याठिकाणाहून हातभट्टी दारु तयार करण्याचे साहित्य, २३५ लीटर हातभट्टी रसायन असा १२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलमानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाला पार्टटाईम जॉबचे आमिष पडले ११ लाखांना – सविस्तर बातमी

लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेउर फाटा परिसरात अवैधरित्या दारू निर्मितीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ७ डिसेंबरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने राखपसरे वस्ती, बेट वस्ती (ता. हवेली) याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एक महिला गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायण तयार करताना मिळून आली. लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे अनुषंगाने ११ महिन्याचे कालावधीत १०३ कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैध गांजा विक्रीवर १४ कारवाया, अवैध जुगारांवर ३५ कारवाया, अवैध गुटखा विक्री, वाहतुक व साठाधारकावर कारवाई केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×