Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ‘अजिंक्य’ मॅस्कॉटचे अनावरण

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान ३७ स्पर्धांचे आयोजन

marathinews24.com

पुणे – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ‘मॅस्कॉट’चे अनावरण नुकतेच करण्यात आले. या मॅस्कॉटचे नाव ‘अजिंक्य’ असे आहे. अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मोहिनी चाफेकर व स्पर्धेचे मुख्य समन्वयक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा भोसले आदी उपस्थित होते.

प्रामाणिक माणसांकडूनच समाजाची जडणघडण – उल्हास पवार – सविस्तर बातमी

‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ येत्या २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. या १५ दिवसीय महोत्सवात शहरातील विविध मैदानांवर एकूण ३७ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहे.

मनोज एरंडे म्हणाले, “भारतीय पारंपरिक आणि ऑलिम्पिकमधील खेळांचा यात समावेश आहे. सांघिक व एकेरी प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, स्विमिंग, बास्केटबॉल, बॉडी बिल्डिंग, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, पिकलबॉल, रोलबॉल, शूटिंग, स्केटिंग, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉल क्लायम्बिंग, वॉटर पोलो, वेट लिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योग, स्क्वॅश यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष ऍथलेटिक्स व ज्येष्ठांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी मनोज एरंडे (९८२२०४५१०१) यांच्याशी संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×