Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

नवले पुल परिसरात पुन्हा अपघात

नवले पुल परिसरात पुन्हा अपघात

कंटेनर चालकाने ५ वाहनांना उडवले

marathinews24.com

पुणे – शहरातील नवले पुल परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कंटेनर चालकाने पाठीमागू दिलेल्या धडकेत ५ वाहनांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी अथवा मृत्यूमुखी पडले नाहीत. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलिसांसह, स्थानिक नागरिक, वाहतूक पोलिसांनी मदतकार्य राबविले.

दंडात्मक कारवाईची ‘पीडीएफ फाईल’ पाठवून तरुणाची फसवणूक – सविस्तर बातमी 

तीव्र उतारावर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मागील गुरूवारी नवले पुलावर झालेल्या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर १३ जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास अशाच पद्धतीने कंटेनर चालकाने वाहनांना धडक दिली. त्यामुळे परिसरातून प्रवास करणार्‍या वाहन चालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, फक्त वाहने एकमेकांना धडकल्यामुळे काचा फुटून नुकसान झाले.

अपघाताने वाहतूककोंडी, दूरवर रांगा

अपघामुळे परिसरातील वाहतूक पुर्णतः खंडित झाली होती. त्यामुळे अनेकांना कोंडीचा सामना करावा लागला. विशेषतःदुपारच्या सत्रात कार्यालयात जाणार्‍या चाकरमान्यांची कोंडीतून सुटका वेळेत झाली नाही. परिणामी अनेकांना कार्यालयात जायला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेन येईपर्यंत वाहतूक पोलिसांनी परिसरातील वाहतूक इतरत्र वळवून रस्ता मोकळा करण्यास प्राधान्य दिले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×