Breking News
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागत

‘तुका म्हणे’ कार्यक्रमात अर्पणा केळकर यांची गायन सेवा

‘तुका म्हणे’ कार्यक्रमात अर्पणा केळकर यांची गायन सेवा

अपर्णा केळकर यांच्या सादरीकरणाराला रसिकांची दाद; आषाढी वारीनिमित्त रंगला ‘तुका म्हणे’ सांगीतिक कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – ‘तुका म्हणे’ कार्यक्रमात अर्पणा केळकर यांची गायन सेवा – संत तुकाराम महाराज यांचा सामान्य व्यक्ती ते संतत्वार्पंतचा प्रवास, त्या काळात त्यांच्या आयुष्यात आणि मनात चाललेला बाह्य आणि आंतरिक झगडा, त्यांना विठ्ठलाच्या रूपाचा-कृपेचा लागलेला ध्यास, संतपदाला पोहोचल्यानंतर त्यांच्यातून प्रकट झालेला अनुभवसंपन्न वाग्वविलास, पांडुरंग भेटीची उत्कटता-निकटता या सर्वांचे अनोखे संगीतमय दर्शन रसिकांना घडले. निमित्त होते आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘तुका म्हणे’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिलासा: भत्त्यांमध्ये मोठी वाढ – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अपर्णा केळकर यांनी रसाळ, मधुर वाणीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज रचित अभंगांचे सादरीकरण करत रसिकांना भक्तीरसाचा अनुभव दिला.

‘तुका म्हणे’ कार्यक्रमात अर्पणा केळकर यांची गायन सेवा

टिळक रस्त्यावरील हिराबाग येथील श्रीराम लागू रंगावकाश येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ हा गजर केल्यानंतर आत्मशक्तीचा परमविलास दर्शविणाऱ्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘भेटी लागी जीवा, लागलीसे आस’ या अभंगाच्या सादरीकरणातून संत तुकाराम महाराज यांना पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली आस रसिकांना भावपूर्णतेचा आनंद देऊन गेली. नाम संकीर्तनाची महती दर्शविणाऱ्या ‘घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे’ या अभंगाला रसिकांनीही गायन साथ देत नामाची महती अनुभवली.

विठ्ठलाला माऊलीच्या स्वरूपात पाहताना संत तुकाराम महाराज यांनी रचलेला ‘विठ्ठल माझी माय, आम्हा सुख उणे काय’ या अभंगाच्या सादरीकरणानंतर अपर्णा केळकर यांनी ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ हा अभंग भक्तीरसपूर्णतेने सादर केला. ‘पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे’ या अभंगातून ‘मी’पणाचा विलय दर्शविणारा भाव उत्पन्न झाला. ‘पद्मनाभा नारायणा’ या अभंगाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. तर कार्यक्रमाची सांगता पद्मविभूषण किशोरी अमोणकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने केली.

अपर्णा केळकर यांना प्रसाद जोशी (पखवाज), कौशिक केळकर (तबला), लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), मंगेश जोशी (तालवाद्य), क्षितिज भट (कीबोर्ड), धवल जोशी (बासरी) यांनी सुमधुर साथसंगत केली. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निरूपण डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले. स्वरसाथ रुचीर इंगळे, गार्गी काळे, शर्विन पिंगे, श्रुती डोरले यांनी केली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top