Breking News
Pune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाण

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

Jejuri Driving Licence Camp : जेजुरी येथे १४ ऑक्टोबरला शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिर

१५ एप्रिल २०२६ रोजी अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे परिवहन (ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू) वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत असून, आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज व लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अमंलबजावणी कार्यशाळा संपन्न – सविस्तर बातमी

खाजगी चारचाकी वाहनांसाठी इच्छुक नागरिकांनी विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट (डीडी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता लिलाव प्रक्रिया पार पडेल.

ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू वाहनांसाठी इच्छुकांनी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसिद्ध करण्यात येईल व त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता लिलाव होईल.

डिमांड ड्राफ्ट “R.T.O., Pune” यांच्या नावे राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेतून काढलेला असावा. लिलावाकरिता डीडी एकाच सीलबंद पाकिटात जमा करणे बंधनकारक आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. राखीव क्रमांक घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी परत मिळणार नाही, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×