Breking News
राज्यातील प्रत्येक क्रीडांगणांवर स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, प्रकाशयोजनांसह सीसीटीव्ही सुविधा अनिवार्य करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देशपुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दापाश, आरोपीला अटकएल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात योग्य नियोजन करा-तालुका कृषी अधिकारीपार्टटाईम नोकरीचे आमिष पडले ६ लाखांनापुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याफुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीड

अनुज्ञप्ती चाचणीसाठी वाढविण्यात आला अपॉइंटमेंट कोटा

लायसन्स चाचणीसाठी पुण्यात अपॉइंटमेंट कोटा वाढवला

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च, कासारवाडी तसेच आळंदी रोड कार्यालय, फुलेनगर येथे पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५ जानेवारी २०२६ पासून पुढील कालावधीसाठी अपॉइंटमेंट कोटा वाढविण्यात आला आहे. या अपॉइंटमेंट दररोज सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

आळंदी रोड कार्यालय, फुलेनगर येथे केवळ दुचाकी संवर्गातील चाचण्या घेण्यात येणार असून, दुचाकी वगळता चारचाकी व इतर सर्व संवर्गातील चाचण्या इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च, कासारवाडी, पुणे येथे होणार आहेत. अनुज्ञप्ती चाचणीसाठी दरराेज २०० चारचाकी व ३०० दुचाकी संवर्गासाठी अपॉइंटमेंट देण्यात येणार असून, ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्ती पुढील सात दिवसांत संपत आहे, अशा अर्जदारांसाठी अतिरिक्त २५ अपॉइंटमेंट राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

वाहन अनुज्ञप्ती चाचणीसाठी अपॉइंटमेंट ही आगाऊ जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यंतच आरक्षित करता येणार असल्याने सर्व अर्जदारांनी वाढीव कोट्याचा लाभ घेऊन आपली अपॉइंटमेंट शक्य तितक्या लवकर आरक्षित करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×